Latest News

6/recent/ticker-posts

धार्मिक क्षेत्रातील नवोदित लेखकांना हिरेमठ संस्थान सहकार्य करणार- डॉ शांतविरलिंग शिवाचार्य महाराज

धार्मिक क्षेत्रातील नवोदित लेखकांना हिरेमठ संस्थान सहकार्य करणार- डॉ शांतविरलिंग शिवाचार्य महाराज 


बी डी उबाळे

औसा: आपल्या जीवनात गुरूला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून गुरुची निष्ठेने सेवा केल्यास त्याचे फळ निश्चित मिळते . गुरुविषयीचा आदरभाव  शब्दबद्ध करण्यासाठी पुढे येणाऱ्या नवोदित लेखकांना हिरेमठ संस्थान सहकार्य करणार असल्याची माहिती हिरेमठ संस्थांचे मार्गदर्शक श्री १०८ डाॕ. शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांनी दिली. औसा येथील हिरेमठ संस्थान मध्ये आयोजित रविवार दि 1 ऑगष्ट 2021 रोजी श्रीमती शकुंतलाबाई शरणाप्पा नागराळे लिखित " भक्तीचा झरा " या पुस्तक प्रकाशन प्रसंगी समीक्षा पर आशीर्वचनात  महाराज बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ष . ब्र .श्री १०८  निळकंठ शिवाचार्य महाराज नागणसूर हे होते यावेळी श्री. ष.ब्र. १०८  महादेव शिवाचार्य महाराज वाई  , हिरेमठ संस्थानचे पीठधिपती श्री. ष.ब्र.१०८ निरंजन शिवाचार्य महाराज,  लेखिका श्रीमती शकुंतलाबाई नागराळे यांची उपस्थिती होते. पुढे बोलताना डॉ शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले लिंगैक्य गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांची व  हिरेमठ संस्थानची सेवा नागराळे परिवाराने अत्यंत निष्ठापूर्वक केली आहे .श्रीमती शकुंतलाबाई नागराळे यांनी आपल्या कवितेतून संस्थानची असलेली निष्ठा आणि विविध विषयांना स्पर्श करून अत्यंत चांगले लिखाण करून समाजाला गुरु-शिष्यांच्या नात्यातून मिळालेल्या अनुग्रहाची प्रचिती याचे दर्शन घडविले आहे.  आगामी काळात औसा तालुक्यातील नवोदित लेखकांच्या पुस्तक प्रकाशनासाठी हिरेमठ संस्थांचे सहकार्य राहील असेही शेवटी डाॕ. शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांनी स्पष्ट केले. हिरेमठ संस्थांच्या ८१ व्या आषाढमासी वार्षिक उत्सवानिमित्त शिवनाम सप्ताह आणि शिवदीक्षा सोहळा कार्यक्रमात " भक्तीचा झरा " पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी कोरोना नियमाचे पालन करून भाविक उपस्थित होते . यावेळी नागणसूर, वाई, येथील शिवाचाऱ्यासह हिरेमठ संस्थांचे पिठाधिपती बाल तपस्वी श्री निरंजन शिवाचार्य महाराज यांचेही शुभेच्छापर आशीर्वचन झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन युवराज हलकुडे यांनी तर प्रणव नागराळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त  केले.

Post a Comment

0 Comments