Latest News

6/recent/ticker-posts

स्वयं शिक्षण प्रयोग व क्रिप्टो रिलीफ इंडिया तर्फे गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप

स्वयं शिक्षण प्रयोग व क्रिप्टो रिलीफ इंडिया तर्फे गरजूंना अन्नधान्य किटचे वाटप


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) शुक्रवार दि. 6 ऑगस्ट रोजी निलंगा तालुक्यातील ताडमुगळी, हासोरी (बु) येथे स्वयं शिक्षण प्रयोग व क्रिप्टो रिलीफ इंडिया च्या संयुक्त विद्यमाने  गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वयं शिक्षण प्रयोग च्या तालुका समन्वयक अंजनाताई साबळे, ताडमुगळी गावातील सरपंच व उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. गावातील मेगा हनुमंत गारोळे व हासोरी (बु) येथील सरपंच उपसरपंच व गावातील लीडर पार्वती गणगणे यांचीही उपस्थिती होती. गावातील गरजू व गरीब कुटुंबातील महिलांना मिळालेले अन्नधान्य याबद्दल त्यांनी स्वयं शिक्षण प्रयोग डायरेक्टर, प्रेमा गोपालन, डायरेक्टर प्रोग्राम उपमनयू पाटील, तबस्सुम मॅडम यांचे सर्वांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments