निटूर-कलांडी शिवारात हरणांचे कळप करत आहेत शेतकऱ्याची सोयाबीन फस्त;शेतकऱ्या पुढे परत संकट
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे) तालुक्यातील कलांडी, डांगेवाडी या शिवारामध्ये मागील पंधरवाड्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक एकरावरील सोयाबीनचे पीक हे पाण्यात वाहून गेले आहेत. त्या पाठोपाठ आता हरणाचे कळप परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे हे हरण कवळी सोयाबीन, तुर, मका, खाऊन शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची नुकसान करत आहेत यामुळे परत शेतकऱ्यांमुळे संकट निर्माण झाली आहे. निटूर, केळगाव, बस्पूर या परिसरामध्ये हरणाचा वावर मोठ्या प्रमाणात आहे "अस्मानी सुलतानी संकटांना शेतकऱ्यांना नेहमी सामोरे जावे लागत आहे यामुळे शासनाने ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना कायमस्वरूपी अनुदान उपाययोजना प्रशासनाने व वन विभागाने मंजूर करावी अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
0 Comments