Latest News

6/recent/ticker-posts

राज्य धनुर्विद्या संघटनेची धुरा पुन्हा एकदा देशपांडे, चांदुरकर यांच्याकडे

राज्य धनुर्विद्या संघटनेची धुरा पुन्हा एकदा देशपांडे, चांदुरकर यांच्याकडे



राज्य कार्यकारिणीवर उस्मानाबादचे प्रवीण गडदे यांची वर्णी

उस्मानाबाद : महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेची नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राज्यातील जिल्हा संघटना मतदारांनी पुन्हा एकदा कौल देत राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे यांची बिनविरोध तर सद्या भारतीय धनुर्विद्या महासंघाचे महासचिव प्रमोद चांदुरकर यांची राज्य संघटनेच्या सचिवपदी निवड केली आहे. राज्य कार्यकारिणी सदस्य मतदानात ६० पैकी ५१ मते घेत उस्मानाबाद जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रवीण गडदे यांनी विजय प्रस्तापित केला. महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेची महेश भवन अमरावती येथे निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून एडवोकेट चंद्रशेखर डोरले, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून एडवोकेट दिलीप तिवारी यांनी तर निवडणुकीत निरीक्षक म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने क्रीडा उपसंचालक विजय संतान व  भारतीय धनुर्विद्या महासंघाच्या वतीने महासंघाचे उपाध्यक्ष चेतन कावलीकर यांनी काम पहिले. नवनिर्वाचित राज्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. अध्यक्षपदी ऍडव्होकेट प्रशांत देशपांडे ( अमरावती ), सचिवपदी प्रमोद चांदुरकर ( अमरावती ), उपाध्यक्षपदी हरिदास रणदिवे ( सोलापूर ) व उदय नाईक ( ठाणे ), सहसचिव पदी सोनल बुंदेले ( पिंपरी चिंचवड ), कोषाध्यक्षपदी रंगराव साळुंके ( हिंगोली ), सदस्यपदी अभिजीत दळवी (अहमदनगर ), लक्ष्मीकांत खीची (औरंगाबाद ), प्रविण गडदे (उस्मानाबाद ), बाबासाहेब जाधव (सातारा ), धनंजय वानखेडे ( वाशिम ), पूनम महात्मे (मुंबई ) यांची वर्णी लागली तर निमंत्रित सदस्य म्हणून राष्ट्रपती व शिवछत्रपती पुरस्कार विजेते सदानंद जाधव यांची निवड करण्यात आली. नूतन राज्य सचिव प्रमोद चांदुरकर यांनी "हर गाव आर्चरी घर घर आर्चरी " हे अभियान हाती घेत गावागावात धनुर्विध्या खेळ प्रचलित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असून भविष्यात ऑलीम्पिक सारख्या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त खेळाडूंना संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना प्रयत्नशील राहील असे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments