Latest News

6/recent/ticker-posts

मधमाशा पालन योजनेसाठी पात्र व्यक्ती व संस्थांनी अर्ज करावेत

मधमाशा पालन योजनेसाठी पात्र व्यक्ती व संस्थांनी अर्ज करावेत


लातूर
:(जिमाका) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. या करीता पात्र व्यक्ति / संस्थांकडुन पूढील दर्शविल्याप्रमाणे  अर्ज  मागविण्यात येत आहे. योजनेची वैशिष्टये :- मध उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वंगुंतवणुक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी / विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता :- वैयक्तिक माधपाळ- पात्रता- अर्जदार साक्षर असावा स्वतांची शेती असल्यास प्राधान्य व य 18 वर्षापेक्षा जास्त, 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य. केंद्रचालक प्रगतिशिल मधपाळ- व्यक्ति पात्रता- किमान 10  वी पास वर्ष 21 पेक्षा जास्त असा व्यक्तिच्या नांवे किमान किंवा त्या व्यक्तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तिच्या नावे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था- पात्रता- संस्था नोंदणीकृत असावी संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1000 चौ.फुट सुयोग्य इमारत असावी. तसेच 1 एकर शेत जमिन स्वमालकीची / भाडयाने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत. अटी व शर्ती :- लाभार्थि निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चीत केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. अधिक माहितीसाठी संपर्क :- जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय एम.आय.डी.सी. एरिया जिल्हा उद्योग केंद्र लातूर दुरध्वनी क्र. 02382-220144 आहे असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments