लॉक डाऊन चे नियम शिथिल झाल्यानंतर आठवडी बाजार फुलू लागले
औसा: तालुक्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याने सध्या लातूर जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असून यामुळे गावोगावी आता आठवडी बाजार बहरू लागले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन सुरळीत होण्याच्या मार्गावर आले असून नागरिक आता बिनधास्तपणे वावरू लागले आहेत. कोरणा-या मारीची भीती बर्यापैकी ग्रामीण भागातून नागरिकांच्या मनातून निघून गेली आहे. यामुळे तालुक्यातील आठवडी बाजार हळूहळू होऊ लागले असून आर्थिक व्यवहार ग्रामीण भागात मजबूत आहे. तर शेतकरी आणि शेतमजूर यांना या आठवडी बाजाराचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. याकरिता ग्रामीण जनजीवन आता कुठे सुरळीत होण्याच्या मार्गावर आल्याचे चित्र हे आठवडी बाजार पाहता लक्षात येत आहे.

0 Comments