पावसा अभावी शिरोळ परिसरातील पिके चालली कोमेजून
शिरोळ:(प्रतिनिधी/सलीमभाई पठाण) परिसरात मागील काही दिवसांपासुन पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनचे पीक कोमेजून जात आहे. मागे पेरणी झाल्याबरोबर अतिवृष्टी झाल्याने दुबार पेरणीचे संकट अंगावर घेऊन बळीराजाने पेरणी केली. पण पुन्हा एकदा आसमानी संकट शेतकऱ्यांसमोर आवासुन उभं राहिलंय. पावसाने ताण दिल्याने उगवलेले सोयाबीन, तुर आणी तत्सम पिके कोमेजून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकट बळीराजाच्या पाचवीला पुंजलेलं आहेच. काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे पण वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार आड येतोच. एकतर रात्रीची थ्री फेज पुरवठा असुन तो पण दर पाच मिनीटाला वीज गुल होते. मग बळीराजा रात्रभर जागुन शेतीला पाणी द्यायचं हे सुध्दा या ढिम्म आणी ढिसाळ प्रशासनामुळे फक्त आणी फक्त आभाळाकडे डोळे लावुन पावसाच्या प्रतिक्षेत बसला आहे. लवकर पाऊस होऊन असलेली पिके तरी हाताशी लागतील का हीच अपेक्षा.

0 Comments