औसा शहराच्या पूर्व व पश्चिम बाजूला बायपास मजूर करण्याची आ.पवार यांची नितीन गडकरीकडे आग्रही मागणी
बी डी उबाळे
औसा: आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघातील चार महत्वपूर्ण विषयाच्या संदर्भात केंद्रीय वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भेट घेतली या भेटीत औसा उड्डाणपूल रद्द करून शहराच्या पूर्व व पश्चिम बाजूला बायपास मजूर करणे, औसा – लामजना – किल्लारी दरम्यानचे साईड पट्यांचे काम प्राधान्याने करून रस्त्याचे चौपदरीकरण करणे, मराठवाडा मेट्रो कोच फॅक्टरी, औसा एमआयडीसी ते लातूर रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग जोडरस्ता म्हणून घोषित करणे व उमरगा – कासार सिरसी – निलंगा – लामजना – औसा – शिवली – उस्मानाबाद – बार्शी” या महामार्गाला सदर रस्त्याला क्रमांक देवून रस्त्याच्या चौपदरीकरण व सुधारणा कामासाठी निधी मंजूर करणे आदी मागण्या केल्या असून बाबत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला दिले आहेत. दि.९ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे झालेल्या या भेटीत नागपूर – तुळजापूर – औसा (३६१) राष्ट्रीय महामार्गावर औसा शहरात उड्डाणपूल नियोजित आहे. या उड्डाणपुलाचा औसा शहरातील महामार्गाशेजारी उदयास आलेल्या बाजारपेठेवर मोठा परिणाम होण्याची भीती शहरातील नागरिकांनी व्यक्त केल्याने. सदरील नियोजित उड्डाणपूल रद्द करून शहराच्या पूर्व व पश्चिम बाजूंना दोन चारपदरी बायपास रोड मंजूर करण्यात यावेत अशी विनंती आ. अभिमन्यू पवार यांनी नितीन गडकरी यांना केली.
यामुळे राष्ट्रीय महामार्ग ३६१ व ५४८ ब वरील वाहतूक गतिमान होईल आणि शहराच्या विकासाला नियोजित दिशा मिळेल. लातूर,उमरगा उस्मानाबाद आदी शहराला बायपास आहे.बायपास मुळे वहातुकिची कोंडी होणार नाही.सोलापूर, पुणे, मुंबई, हैद्रबाद, गुलबर्गा जाणारी वाहतुक मोठ्या प्रमाणात औसा शहरातून जाते
या बायपास मुळे वाहतुकीमुळे वाहनांची कोंडी नागरिकांची गैरसोय दुर होईल.या चर्चेदरम्यान लातूर – औसा – लामजना – किल्लारी – उमरगा महामार्गावरील वाढलेल्या अपघातांची माहिती देऊन औसा – लामजना – किल्लारी दरम्यानचे साईड पट्यांचे काम प्राधान्याने करून सदरील रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे अशीही विनंती आ. अभिमन्यू पवार यांनी केली.यामुळे किल्लारी – औसा रस्त्याच्या सौद्यात भर पडून विकासाला अधिक चालना मिळणार आहे.
यासह २०१७ साली राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्त्वता मान्यता देण्यात आलेल्या “उमरगा – कासार सिरसी – निलंगा – लामजना – औसा – शिवली – समुद्रवाणी पाटी – उस्मानाबाद – बार्शी” या महामार्गाला अद्याप राष्ट्रीय महामार्ग क्रमांक देण्यात आलेला नसल्याचे व त्यामुळे रस्ता सुधारणा काम रखडले असल्याचे निदर्शनास आणून देऊन नितीन गडकरी यांना सदर रस्त्याला क्रमांक देण्याची तसेच या रस्त्याच्या चौपदरीकरण व सुधारणा कामासाठी निधी मंजूर करणे यासह मराठवाडा मेट्रो कोच फॅक्टरीला पूरक असे औद्योगिकरण घडवून आणण्यासाठी मराठवाडा मेट्रो कोच फॅक्टरी, लातूर ते औसा एमआयडीसी रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग जोडरस्ता म्हणून घोषित करण्यात यावे अशी महत्त्वपूर्ण मागणी या भेटी दरम्यान आ. अभिमन्यू पवार यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या सर्व मागण्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश गडकरी यांनी प्रशासनाला दिले आहेत.यामुळे येणाऱ्या काळात या सर्व मागण्या मार्गी लागतील असा विश्वास आ. अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे. या चर्चेवेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व माजी मंत्री डॉ. संजय कुटे उपस्थित होते.

0 Comments