मनसेकडून निलंगा येथे रस्त्यावरील खड्ड्यात कागदी नौका
विशेष प्रतिनिधी/इरफान शेख
निलंगा: शहरासाठी दोन कोटींचा निधी मनसेच्या आंदोलनानंतर आमदारांनी मंजूर केला अश्या बातम्या आल्या परंतु रस्ते दुरुस्ती कुठेच सुरू नाही त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष सूरज पटेल यांच्या नेतृत्वाखाली पाण्याने भरलेल्या मोठया खड्ड्यात कागदी नौका सोडत उपरोधात्मक आंदोलन केले.आमदार संभाजी पाटील यांनी "निलंगा" चे "चिखलगा" केले आहे अश्या घोषणा देत खड्ड्यात गेलेल्या नगरपालिकेला जागे करण्याचा प्रयत्न केला. या वेळी तालुकाउपाध्यक्ष कृष्णा जाधव,तालुकाउपाध्यक्ष नजीर मुजावर,अबूबकर सय्यद, विशाल चाबुकस्वार, जीवन कांबळे, साई कांबळे, ओम कांबळे, अनिल कासार,प्रदिप माने,शंकर गिरीक्रष्णा सुरवसे,बालाजी सुरवसे.
0 Comments