Latest News

6/recent/ticker-posts

आम्ही मराठा संघटनेच्या वतीने भुतमूगळी येथे रक्तदान शिबिर

आम्ही मराठा संघटनेच्या वतीने भुतमूगळी येथे रक्तदान शिबिर


निलंगा
:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) तालुक्यातील भुतमूगळी येथे शनिवारी "आम्ही मराठा" संघटनेच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सध्या करोना सदृश्य परिस्थिती जिल्ह्यात असल्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी रक्तदान करून जिल्ह्यामध्ये रक्ताचा साठा वाढून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन केले होते यामुळे आम्ही मराठा संघटनेयांच्या वतीने आज भुतमूगळी जिल्हा परिषद शाळेच्या जवळ असलेल्या येथील पाटील मंगल कार्यालय येथे 38 जनाने यामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे आयोजन "आम्ही मराठा" संघटनेचे निलंगा तालुका प्रमुख बाळासाहेब पाटील, आकाश भालके , सदाशिव उसनाळे ,अतुल साळुंके यांनी केले होते यामध्ये महिला व पुरुषाने सहभाग नोंदवून आपली सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले आहेत यांच्या समाजकार्याबद्दल परिसरात अभिनंदन व कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments