Latest News

6/recent/ticker-posts

उपजिल्हाधिकारी विकास माने यांच्या नांदेड येथे झालेल्या बदलीच्या आदेशामुळे 'इशारा परिवाराने' दिल्या शुभेच्छा

उपजिल्हाधिकारी विकास माने यांच्या नांदेड येथे झालेल्या बदलीच्या आदेशामुळे 'इशारा परिवाराने' दिल्या शुभेच्छा


के वाय पटवेकर

निलंगा: उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय  दंडाधिकारी निलंगा विकास माने यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत त्यांची नवीन नियुक्ती नांदेड येथे उपविभागीय अधिकारी या रिक्त पदावरती झाली आहे. अतिशय कार्यकुशल व जनतेच्या अडचणी  लक्षात घेऊन काम करणारे असे कर्तव्यदक्ष उपजिल्हाधिकारी विकास माने यांची ओळख निलंगा सह देवणी, शिरुळ आनंतपाळ तालुक्यामध्ये आहे. त्यांची नुकतीच नांदेड येथे प्रशासकीय बदली झाली आहे. यामुळे "मराठी अस्मितेचा इशारा" परिवाराच्या वतीने आज रविवारी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी "मराठी अस्मितेचा इशारा" या वर्तमानपत्राचे संपादक के. वाय. पटवेकर, सहाय्यक संपादक सागर तापडिया, इरफान शेख, सत्तार सौदागर, दै. लोकमतचे प्रतिनिधी जावेद मुजावर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. गत तीन वर्षापासून त्यांनी, कार्यक्षेत्रात कार्य करत असताना त्यांच्या उपविभागा अंतर्गत येणाऱ्या तिनीही तहसीलदार कार्यालयावरती नियंत्रण ठेवत जलसंधारण, शेत-शिवार प्रश्नांचा तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या जटिल प्रश्नावरती सुद्धा अतिशय सौम्यपणे लोकांच्या भावना लक्षात घेऊन कार्य करत आपला ठसा उमटवला आहे. कोविड संसर्गाच्या काळामध्ये सुद्धा कोविड इन्सिडेंट कमांडर म्हणून कार्य करत असताना लवकर निर्णय घेऊन त्या पद्धतीची सक्षम यंत्रणा कामी लावून त्यांनी कोविड मधून सुद्धा विभागाला नियंत्रणामध्ये आणले याची जाणीव जनतेला सदैव स्मरणात राहीलच कारण इतका मृदू स्वभावी मितभाषी व सर्वसामान्याचे प्रश्न जाणून घेऊन मार्गी लावणारे असे अधिकारी लाभले हे तालुक्याचे भाग्यच.

Post a Comment

0 Comments