Latest News

6/recent/ticker-posts

भादा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अबेट मोहीम सुरू;साथरोग टाळण्यासाठी मोहीम

भादा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अबेट मोहीम सुरू;साथरोग टाळण्यासाठी मोहीम 


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सध्या मोहीम राबविली जात असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आरोग्य सेवक रवी कांबळे आणि विविध विभागातील आशा कार्यकर्ती यांच्याकडून ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. याबाबत मंगळवार दि २१ऑगष्ट २१रोजी भादा गावामध्ये आरोग्य सेवक कांबळे रवि  आशा कार्यकर्ती सुवर्णा राऊत व महादेवी वाडकर यांनी अबेट मोहीम आनंदनगर भागात राबवून घरातील पाणी साठवण्याच्या सिंटेक्स,भांडी स्वच्छ धुऊन आठवड्यातून एक दिवस शनिवारी हा कोरडा दिवस म्हणून पाळणे बाबत प्रत्येक घरात पोहचू न माहिती दिली आहे. तसेच त्यांना आरोग्य शिक्षण देण्यात आले तसेच पिण्याच्या पाण्याच्या नळ योजनेचे ओटी टेस्ट करण्यात आले  व परिसर स्वच्छता गटारी वाहत्या करणे मच्छरदाणीचा वापर करणे असे गावात आरोग्य शिक्षण जनजागृती करण्यात आली, या कामी वैद्यकीय अधिकारी डॉ गोविंद रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र भादा येथील कर्मचारी आणि आशा कार्यकर्ती या नागरिकांना भेटून जनजागृतीचे काम चोख बजावत असल्याचे भादा कार्यक्षेत्रात दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments