Latest News

6/recent/ticker-posts

भादा ठाण्यांतर्गत अवैद्य धंद्याच्या विरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे ठाण्यावर तीन सप्टेंबर रोजी मोर्चा

भादा ठाण्यांतर्गत अवैद्य धंद्याच्या विरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे ठाण्यावर तीन सप्टेंबर रोजी मोर्चा


बी डी उबाळे

औसा: अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व  ब्रिक्स मानव अधिकार मिशनच्या वतीने दिनांक 3 सप्टेंबर वार शुक्रवार रोजी अवैध धंदे बंद करा या मागणीसाठी भादा पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे भादा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 45 गावे येतात यातील बहुतांश गावांमध्ये दारू,गांजा,मटका आणि गुटका सर्रास विकला जातो. बऱ्याच गावातून अनेक वेळा पोलिसांना निवेदन दिली मोर्चे काढले आंदोलन केली पण भादा पोलीस या अवैध धंदेवाल्या विरुद्ध कसलीच ठोस कार्यवाही करीत नाहीत. ज्या गावातून या दारू वाल्या विरुद्ध आंदोलने होतात त्या गावातील दारू वाल्यांना सांगून आंदोलन करत्याविरुद्ध विनयभंगाची चोरीची आणि मारामारीची खोटे गुन्हे दाखल केले जातात. म्हणजेच पुन्हा लोकांनी आंदोलनच करू नये खोट्या केसेसमुळे पुरुष आणि महिला घाबरून गेले आहेत. पोलिसाच्या खबऱ्याकडून गावात अशी अफवा पसरली जाते की आंदोलनकर्त्या महिलावर आणि पुरुषावर मोठे गंभीर गुन्हे दाखल होणार असून त्यांना दोन महिने जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे यामुळे भादा ठाण्या अतर्गत असणाऱ्या गावातील आंदोलनात येणाऱ्या लोकांवर प्रचंड मोठा दबाव येत असल्याची माहिती अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी औसा येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

Post a Comment

0 Comments