Latest News

6/recent/ticker-posts

मदनसुरी येथे लहान बालकांची आरोग्य तपासणी

मदनसुरी येथे लहान बालकांची आरोग्य तपासणी



मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) मंगळवार दि. 31 ऑगस्ट रोजी निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथे सॅम मॅम धडक शोध मोहीम राबविण्यात आली. यावेळी 0 ते 6 वर्षे वयोगटातील एकूण 300 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 1 सॅम 7 मॅम लाभार्थी बालके निघाले, तसेच आजारी बालकांमध्ये एकास पुढे रेफर करण्यात आले तर एका लाभार्थी बालकास हाताच्या बोटाच्या तपासणीसाठी लातूर येथे रेफर करण्यात आले व बाभळगाव येथे पुनर्वसित कुपोषित केंद्रामध्ये तीन लाभार्थी बालकांना रेफर करण्यात आले. यामध्ये पुणे येथे रेफर केलेल्या लाभार्थी बालकांना एकूण दहा लाखापर्यंतचा खर्च प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. विविध आरोग्य विषयक तक्रारी बाबत वैद्यकीय अधिकारी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अंगणवाडी च्या माध्यमातून दर दोन महिन्याला बालकासाठीचा पूरक पोषक आहार घरपोच दिला जातो. त्याचप्रमाणे बालकाचे वजन, उंची, बुद्यांक, श्रेणी, चाचणी दर महिन्याला केंद्रात घेण्यात येते. यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी परिश्रम घेतले. या लाभार्थी बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती बनसोडे एस.जी., डॉ.चव्हाण जे.डी., डॉ. शेख एम.डी., सिस्टर पाटील यांची उपस्थिती होती. सदर लाभार्थी बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी, बी.डी.सुरवसे, के.व्ही.मनिपाटे, जे.डी.जाधव, व्ही.जी.माने, एम.यु.शिंदे,यु.आर.कोकणे, एम.एस.सुर्यवंशी, जे.एस. माने, व्ही.व्ही.जाधव, बी.टी.कांबळे, आर. एम.शेख, एस.आर.कांबळे, एस.टी. जोगदंड यांनी सहकार्य केले. यावेळी पालकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments