मदनसुरी परिसरात घराघरात श्रीकृष्ण जन्माअष्टमी साजरी
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) सोमवार दि. 30 ऑगस्ट रोजी ग्रामीण परिसरात कोरोनाच्या नियमाचे पालन करत घराघरातच भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली. योगेश्वर श्रीकृष्णाचा दिवसभर उपवास करून, कृष्ण भक्तांनी घरातच आकर्षक सजावट करून कृष्णासाठी पाळणा बांधून पाळण्यात कृष्णाची मनमोहक मूर्ती ठेवण्यात आली होती. महिला भगिनींनी एकमेकांच्या घरी जाऊन भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली. योगेश्वर भगवान श्रीकृष्णाचे पाळणे गाऊन सुटवडा, लाडू आदींचे प्रसाद वाटप केले. यावेळी कृष्णाचे नाव ठेवण्याचे कार्यक्रम ही घेण्यात आले, भगवान श्रीकृष्णाने माणसाने उत्तमोत्तम जीवन कसे जगावे व जीवन हे सुख आणि दुःखाच्या धाग्यांनी विणलेले आहे, संघर्ष हा जीवनाचाच भाग असल्याने द्विधा स्थितीत सापडलेल्या व्यक्तीला भगवान श्रीकृष्णाचे जीवन प्रेरक, दिशादर्शक व अनुकरणीय आहे. म्हणूनच नर करणी करे तो, वो सौ नर का नारायण बन जाये या म्हणी प्रमाणे तो देवत्व प्राप्त करू शकतो, हे भगवान श्रीकृष्णाने जगाला दाखवून दिले आहे. म्हणूनच घरा-घरात श्रीकृष्णाचे उपासक मोठ्या उत्साहाने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात.

0 Comments