Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथील विद्यार्थ्याने साजरा केला ऑनलाइन पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी

निलंगा येथील विद्यार्थ्याने साजरा केला ऑनलाइन पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी

निलंगा:( विशेष प्रतिनिधी इरफान शेख ) ज्ञानदीप बालविहार प्री स्कूल निलंगा मधील विद्यार्थ्याने आज ऑनलाइन पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरा केला करोणाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील संपूर्ण शाळा बंद आहेत तरी ज्ञानदीप बालवीहार मध्ये ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देण्याचे कार्य सातत्याने सुरूच आहेत. त्याचबरोबर अनेक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य देखील या बालविहार मधून होत असतात त्याचाच एक भाग म्हणून आजची श्रीकृष्ण जन्माष्टमी ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला यामध्ये अनेक विद्यार्थी श्रीकृष्णाच्या वेशभूषा मध्ये व राधेच्या वेशभूषा मध्ये सहभागी झाले होते या शाळेतील सहशिक्षिका जाजू मॅडम भजन म्हणून सर्वांचे मन वेधून घेतले त्याच बरोबर शाळेतील सहशिक्षिका संगीता मॅडम रेणुका मॅडम नंदिनी मॅडम यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले तर शाळेचे संचालक मल्लीकर्जून कोळळे यांनी आजच्या जन्माष्टमी चे महत्व आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले आजच्या कार्यक्रमाचे संचलन शाळेची सहशिक्षिका सौ वैशाली मॅडम यांनी केले या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी पालक व शिक्षकवृंद सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments