Latest News

6/recent/ticker-posts

"बिग बॉस 13" चे विजेते अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन

"बिग बॉस 13" चे विजेते अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन


मुंबई
:( प्रतिनिधी/मनोज बरडे ) लोकप्रिय अभिनेता आणि "बिग बॉस 13" चे विजेता सिध्दार्थ शुक्लाचं गुरूवारी निधन झालं आहे. सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती सगळीकडे पसरत आहे. आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सिद्धार्थचा मृत्यू झाला आहे. सिद्धार्थने आपल्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचं आभार मानलं होतं. डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थचा मृतदेह कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. त्याचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला, अद्याप हे सांगणे कठीण आहे. मात्र त्याच्या शरिरावर कोणतीह बाह्य जखम नाही आहे. सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल आणि शवविच्छेदन अहवालानंतर त्याचप्रमाणे सिद्धार्थसह राहणाऱ्यांचा जबाब नोंदवला जाईल, त्यानंतर यावर स्पष्ट काही सांगता येईल. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments