माझं लातूरच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी मोफत मोतीबिंदू निदान, शस्त्रक्रिया आणि नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन
लातूर:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) दि.1 - माझं लातूर परिवाराच्या वतीने येत्या 5 सप्टेंबर रोजी भव्य अशा मोफत नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा सुमारे 550 जणांनी नोंदणी केली आहे. येशील शिवछत्रपती वाचनालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान टाऊनहॉल येथे दि.5 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते सकाळी 10:00 वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिबिरासाठी 550 रुग्णांनी नावनोंदणी केली आहे. फक्त नोंदणी केलेल्याच रुग्णांची तपासणी या शिबिरात होणार असून इतर लोकांनी गर्दी करू नये तसेच शिबिरात येताना मास्क आणि सॅनिटायझर याचा उपयोग करून योग्य अंतर पाळावे असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. तपासणीसाठी येताना नाव नोंदणी केलेला अर्ज सोबत आणणे अनिवार्य आहे.

0 Comments