कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याची बदली; अवघा तालुका झाला भावूक
प्रशांत तांबोळकर
शिरूरअनंतपाळ: एखाद्या पोलिस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर सर्वसामान्य जनता आणि अधिकाऱ्यांनी मिळून अशाप्रकारे जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम शिरूरअनंतपाळ तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला. अनंतपाळ महाराजांचा आदर्श घेऊन गेली दोन वर्षे परमेश्वर कदम यांनी शिरूरअनंतपाळ पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यभार पाहताना सर्वसामान्यांशी संपर्क वाढवताना तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. येथील दबंग, कर्तव्यदक्ष, नि:स्वार्थी आणि संवेदनशील पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांची तालुका जळकोट येथे बदली प्रशासकिय कारणावरुण झाल्याने त्यांची तालुक्यातील ग्रामस्थ , गावोगावचे पोलीस पाटील व जेष्ट नागरिक , पञकार व पोलीस ठाण्यातील कर्मचार्यानी त्यांची वाजतगाजत सजविलेल्या जीपवरून शहरातून मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. या वेळी सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिक भावनाविवश झाले होते. कोरोनाकाळात पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी जनजागृतीसाठी युवकांच्या मदतीने कोरोना वॉरियर्सची विशेष पथके तयार केली. लसीकरणासाठी गाव वस्ती तांड्यावर जाऊन नागरिकामध्ये जनजागृतीही केली. अनेक कुटुंबीयांना स्वखर्चातून संसारोपयोगी साहित्य, किराणा, धान्य आदी जीवनावश्यक वस्तू देऊन वेळोवेळी माणुसकीचे दर्शन घडविले. ‘पोलिस हाच जनतेचा खरा मित्र’ ही संकल्पना राबविल्याने नागरिकांबरोबरच सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये ते लोकप्रिय ठरले होते. जनतेकडून पोलिसांबद्दल वाढलेले प्रेम प्रामाणिक सेवेचे प्रतीकफुलांनी सजविलेल्या जीपवर श्री. परमेश्वर कदम यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. चौका-चौकांत महिलांकडून औक्षण, तर नागरिकांकडून सत्कार होत होता. मिरवणुकीच्या शेवटी पोलीस स्टेशनमध्ये नवीन आलेले पोलीस निरिक्षक अंगद सुडके यांचे शालश्रीफळ व फेटा बांधुन ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला . पोलीस प्रांगणामध्ये झालेल्या बदलीमध्ये निरोप समारंभात परमेश्वर कदम यांना निरोप देण्यात आला. भानुदार सांळुके एआय एस. हे सेवानिवृत्त झाल्याबदल त्यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला. पोलीस निरिक्षक कदम म्हणाले की ''सेवाकाळात काम करताना कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचा दबाव नव्हता. त्यामुळे प्रामाणिक सेवा करून जनतेला न्याय देता आला. जनतेकडून पोलिसांबद्दल वाढलेले प्रेम हे आम्ही केलेल्या प्रामाणिक सेवेचे प्रतीक आहे. शिरूरअनंतपाळ येथून आपली बदली करण्यात आली नसून बदली हि प्रशासकीय कारणावरुन होत असल्याचे सांगितले . यावेळी महादेव आवाळे, नरसिंग शिंदे व इतरानी आपले मनोगत व्यक्त केले. या निरोप समारंभाला येरोळचे माजी सरपंच अतुल पाटील गंभीरे, राष्ट्रवादीचे ता. अध्यक्ष विठ्ठराव पाटील, महादेव आवाळे, एकनाथ पौळकर, संदिप धुमाळे, सुधीर लखनगावे, जर्नाधन पाटील सुमठाणकर, सोमेश्वर तोंडारे, उत्तम गायकवाड, पञकार संघठणेचे अध्यक्ष दयानंद कुंभार, उपाध्यक्ष ओमप्रकाश तांबोळकर, आमर माडजे, पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. सुञसंचलन जमादार हरिदास पाटील यांनी केले तर उपिस्थांचे आभार शिवकुमार पाटील यांनी मानले.

0 Comments