निटुर येथील दुभाजकाला सुरूवातीला दिशादर्शक फलक नसल्याने दुचाकीस्वाराचा अपघात; दोन जण गंभीर जखमी
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) तालुक्यातील निटूर येथे काल सायंकाळी सात वाजता निटूर गावच्या सुरुवातीला रस्त्यामधील दुभाजकांचा अंदाज न लागल्याने व दुभाजक काच्या सुरुवातीला दिशादर्शक फलक नसल्याने दुचाकीस्वाराचा धडकून जोराचा अपघात झाला आहे त्यामध्ये दोन जण गंभीर जखमी असून जखमींना लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की काल सायंकाळी सात वाजता मुगाव मार्गे निटुर च्या दिशेने निघालेली दुचाकी निटुर गावच्या सुरुवातीला लातूर ते जहीराबाद महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी रस्ता दुभाजक बनवण्यात आले आहे परंतु त्या दुभाजकाला कोणतेही दिशादर्शक फलक किंवा रेडियमचा वापर नसल्यामुळे दुचाकीस्वाराचा रस्त्याचा व रस्ता दुभाजकाच्या अंदाज न लागल्याने दुचाकी रस्त्यातील दुभाजकाला जाऊन धडकल्याने मोठा अपघात झाला आहे अपघातामध्ये सचिन बंडगर राहणार शिरूर वय 35 वर्ष व कोमल रुपनार राहणार मुगाव वय 12 वर्ष हे दोघे गाडी वरून पडून गंभीर जखमी झाले होते स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी निटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले होते. परंतु दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत असल्यामुळे निटुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीनिवास मोरे यांनी त्यांना पुढील उपचारासाठी लातूर शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. धडक एवढी जोराची होती की दुचाकी ही धडके पासून पन्नास फुटापर्यंत घसरून गेली व दोघांच्याही डोक्याला जबर मार लागला आहे. सदरील ठिकाणी मागील आठ दिवसात हा दुसरा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. महामार्ग कंपनीला वेळोवेळी सांगून सुद्धा त्यांनी रस्ता दुभाजक यामध्ये कोणतेही दिशादर्शक फलक न लावल्याने असे अपघात होत आहेत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
महामार्ग च्या कंपनी चे वाहने ग्रामस्थांनी आडवली
वेळोवेळी महामार्ग कंपनीच्या जनरल मॅनेजर ला सांगून सुद्धा निटुर सह महामार्ग रोड वर अनेक ठिकाणी कोठेही दिशादर्शक फलक नसल्याने व रस्ता दुभाजकाला कुठेही दिशादर्शक फलक रेडियम नसल्याने अपघात होत आहे याची माहिती देऊन सुद्धा हे दिशादर्शक फलक लावण्यासाठी विनंती करून सुद्धा महामार्ग कंपनी निष्क्रिय असल्यामुळे या झालेल्या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी महामार्ग बनवणाऱ्या कंपनीचे टिप्पर आडवून काहीवेळ गोंधळ केला.
【】 काल रात्रीच्या दुचाकी अपघातानंतर महामार्ग कंपनीच्या वतीने रस्ता दुभाजकाच्या ठिकाणी बसले दिशादर्शक फलक.


0 Comments