मराठा सेवा संघ अठरापगड जातीतील समाज बांधवाना एकत्र घेऊन जाणारी वैचारिक चळवळ- अमोल ताकभाते

निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) 01 सप्टेंबर हा मराठा सेवा संघाचा स्थापना दिवस. वर्धापन दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी मराठा सेवा संघाचा 31 वा वर्धापन दिवसाचे औचित्य साधून निलंगा मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ सृष्टी सभागृहत" मराठा सेवा संघाचे सामाजिक सांस्कृतिक योगदान "या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री एम. एम. जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार गणेश जाधव व गटविकास अधिकारी अमोल ताकभाते हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शुभेच्छा पर मनोगतात अमोल ताकभाते यांनी मराठा सेवा संघ ही सर्व अठरापगड जातीतील समाज बांधवाना एकत्र घेऊन जाणारी वैचारिक चळवळ आहे. या चलवळीत म. फुल्यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचाराचे साम्य दिसते. म्हणून या संघटनेच्या माघे समाज उभा असल्याचे मत व्यक्त केले. तर दुसरे अतिथी तहसीलदार गणेश जाधव यांनी सेवा संघाच्या वैचारिक चळवळीचा मी एक सदस्य असल्याचे समाधान असल्याचे सांगून मराठा बहुजन समाजातील शेतीच्या वादातून भांडणे पूर्वी पेक्षा कमी झाली असली तरी ते बंद झालेले नाहीत. ही खंत व्यक्त करून सेवा संघाच्या न्याय कक्षाने या मध्ये अधिक लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली. कारण शेतीच्या वादातून होत असलेले तंटे आपापसात सामंजस्याने मिटले तर अनेक कुटुंब सुखी जीवन जगतील हे प्रशासनातील आपल्या अनुभवावरून सांगितले. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तथा निलंगा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. हंसराज भोसले यांनी. माघील 30 वर्षातील "मराठा सेवा संघाचे सामाजिक सांस्कृतिक योगदान" या विषयावर सविस्तर आणि नेमके पणाने मार्गदर्शन करताना. सेवा संघाच्या निर्मितीपूर्वीचा महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक संघर्ष 12 व्या शतकापासून ते 20 व्या शतकापर्यंत संता च्या चळवळीपासून ते म. फुल्यांची सत्यशोधक चळवळ, डॉ. बाबासाहेबाच्या बौद्ध धर्म स्वीकारण्या पर्यंत, छ. शाहू महाराज, श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या मानवतवादी, समतावादी संविधानवादी विचारमुळे झालेल्या समाज जागृतीचा आणि संघर्षाचा इतिहास सांगून. 1 सप्टेंबर 1990 ला मराठा सेवा संघाची निर्मिती जागतिकीकरणा च्या प्रारंभ काळात कशी झाली. याची वस्तुनिष्ठ मांडणी करून, मागील 30 वर्षात सेवा संघाने 21 व्या शतकात शिवधर्माचा म्हणजे मुळ सिंधूविचाराच्या धर्माचा समाजाला दिलेला पर्याय ही सांस्कृतिक उपलब्धी असल्याचे सांगितले. सेवा संघाने "प्रबोधनातून परिवर्तन" हे कृती कार्यक्रम आपल्या 32 कक्षाच्या माध्यमातून राबविला. व महाराष्ट्रासह सेवा संघ देश विदेशात पोहचवीला. भविष्यात सेवा संघाला वैचारिक लढाई ही अशीच लढावी लागणार आहे. झालेल्या चुका दुरुस्त करून आत्मचिंतन करून समाजाच्या प्रगतीसाठी, विकासाठी, रोजगार, बेकारी, आरोग्य, शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान विज्ञान, या क्षेत्रात भरीव कार्य करण्याची गरज असल्याचे मतव्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष उत्तम शेळके यांनी केले तर सूत्रसंचलन गणेश गायकवाड यांनी केले. आभार सचिव आर. के. नेलवाडे यांनी मानले. या सेवा संघाच्या वर्धापन कार्यक्रमास सेवा संघाचे जुने सर्व संस्थापक जेष्ठ सदस्य, तुकाराम भालके, दिलीप धुमाळ, एस. एन. शिरमाळे, डी. एन. बरमदे, पी. एस. सगरे, व्यापारी -उद्योजक माकणीकर गुरुजी, विष्णू मोहिते, अंबादास जाधव, सेवा संघाचे पदाधिकारी इंजि. मोहन घोरपडे, डॉ. नितीन चांदुरे, डॉ. उद्धव जाधव, प्रा. विश्वनाथ जाधव, भास्कर यादव,विनोद सोनवणे, प्रमोद कदम, कुमोद लोभे, ऍड. तिरुपती शिंदे, डॉ. सचिन बसुदे, डी. बी बरमदे, अमरदीप पाटील, जिजाऊ ब्रिगेड च्या शिवमति समाधान ताई माने, अर्चना मोरे, वैशाली इंगळे, अंजली भोसले, रंजना जाधव, लता जाधवपत्रकार बांधव, शिक्षक, वकील, डॉक्टर इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments