निटुर ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे पाणीटंचाई;विद्युत डीपी दीड महिन्यापासून बंद
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) तालुक्यातील निटुर(मोड) येथे ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे मागील दीड महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे निटूर(मोड) वर पाणी पुरवठा करणारा डीपी हा मागील दीड महिन्यापासून बंद आहे. या डीपीवर काही कनेक्शन हे शेतकऱ्याचे पण आहेत. त्याचे बिल भरा मग डीपी मिळेल म्हणून डीपी दिला नाही. डीपी वर अवलंबून असणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हा डीपी बंद असल्यामुळे ही पाणीटंचाई निर्माण झाली आहे परंतु ग्रामपंचायती या विषयाकडे लक्ष देत नसल्याने लोकांच्या पाणीटंचाईच्या अडचणीत भर पडली आहे. थकबाकीदारांचे बिल भरल्याशिवाय डीपी देणार नाही असे विद्युत महावितरण कंपनीने बजावले आहे. यामुळे ग्रामस्थांना चांगलीच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. लवकरात लवकर निटूर ग्रामपंचायतने या विषयाकडे लक्ष देऊन महावितरण आला सोबत घेऊन विद्युत पुरवठा चालू करावं व गावकऱ्यांचे पाण्याची अडचण दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे.
0 Comments