धानोऱ्यात आय.सी.आय.सी.आय फाउंडेशन तर्फे खवा व पनीर मशीन
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील मौजे धानोरा गावात आय.सी.आय.सी. आय फाउंडेशन तर्फे धानोरा गावातील अभिमन्यू व्यंकटराव जाधव यांना दुधप्रक्रिया उद्योग करण्यासाठी खवा व पनीर मशीन देण्यात आली. आज अभिमन्यू जाधव यांच्या घरी खवा व पनीर मशीनीचे उदघाटन संपन्न झाले. गावचे सरपंच गोविंद जाधव यांच्या प्रयत्नांने शेतकरी अभिमन्यू जाधव यांना एक उद्योगांची संधी प्राप्त झाली आहे यावेळी उपस्थित सरपंच गोविंदराव मारोती जाधव,आय सी आय सी आय फाउंडेशनचे बालाजी शिंगणे, सोमनाथ स्वामी, व उत्का येथील खवा उत्पादक धनराज शिंदे , अभिमन्यू जाधव, दीपक जाधव आदी जण उपस्थित होते.

0 Comments