१२ रूग्णवाहिकांचे लोकार्पण; आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा उपक्रम
लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी हिरवा झेंडा दाखवून रूग्णवाहिकांचे केले उदघाटन
निलंगा:(प्रतिनिधी/रमेश लांबोटे)पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वाढदिवस अन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी १२ रूग्णवाहिकांचे लोकार्पण केले. १७ सप्टेंबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ वा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या दोन्हीचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील भाजपचे आमदार तथा माजी पालकमंञी संभाजी पाटील निलंगेकर व लातूर जिल्ह्याचे खा.सुधाकर शृंगारे यांच्या स्थानिक विकास निधीतून निलंगा तालुक्यातील १२ प्राथमिक आरोग्य केंद्राला रूग्णवाहिका दिली आहे. या लोकार्पण सोहळ्याला जि.प.उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, कृषी सभापती गोविंद चिलकुरे,नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगरध्यक्ष मनोज कोळ्ळे, उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, तहसिलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, निलंगा उपजिल्हा रूग्णालयाचे अदिक्षक दिलीप सौंदळे, तालुका आरोग्य अधिकारी प्रदिप जाधव, जि.प.सदस्य संतोष वाघमारे, संजय दोरवे, न.प.सभापती इरफान सय्यद, प.स.सभापती राधा बिराजदार, उपसभापती अंजली पाटील, प.स.गोकर्णा पाटील, हरीभाऊ काळे, कालीदास पाटील,उर्मिला जाधव, रमेश जाधव, अजित माने यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 Comments