मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने काँग्रेस कार्यलयात ध्वजारोहण
निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) निलंगा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै.शेषराव वाघमारे (माजी आमदार) व कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना बोलताना अशोकराव म्हणाले की, येणाऱ्या नगरपरिषद पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका जिकण्यासाठी आज पासूनच प्रारंभ केला पाहिजे. कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विकासरूपी धोरणाचा विचार अंगीकृत करून सामान्य माणसापर्यंत पोहचवणीसाठी कार्य करावे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तिन्ही तालुक्यात विविध कार्यकारिणीचे कमिटीचे पुनर्वसन करणार असून काँग्रेस पक्षाचे सर्व धर्मसमभाव चे विचार व पक्षाने केलेल्या विविध विकास कार्याची जाणीव करून देण्यासंबंधी मार्गदर्शन केले. महावीकास आघाडी करण्यासंबंधी प्रांताध्यक्ष जे आदेश देतील. त्याचे पालन करणार असल्याचे म्हणाले. यावेळी उपस्थितांमध्ये काँग्रेस चे नेते जगनाथ पाटील, अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे, माजी नगरसेवक तथा प्रदेश काँग्रेस चे सदस्य मोहम्मद खान पठाण,Adv. जगदीश सूर्यवंशी,महेश चिकराळे, अमोल सोनकांबळे, विलास मुगळे, तानाजी आर्य,अशोक शेटकार, शेषराव कांबळे, Adv. विक्रांत सूर्यवंशी, देविदास जाधव, सुग्रीव कांबळे, गोविंद सूर्यवंशी, ओम शिंदे, रोहन सुरवसे, अंजुम शेख, नागनाथ घोलप, भवानी संतोष नाईकवाडे, प्रकाश गायकवाड, विठ्ठल बारतोंडे, नवनाथ कुदुंबळे, सोनाजी कदम, प्रकाश पाटील बकलीकर, लक्ष्मण बोधले, सुधीर लखनगावे, तानाजी निडवांचे, जागले, गंगाधर चव्हाण, बर्गे, बालाजी कांबळे, तुषार सोमवंशी, अजित नाईकवाडे, अमित नितनवरे, चांद कुरेशी आदी उपस्थित होते.

0 Comments