खासदार ओवैसींच्या निवासस्थानी हल्ला करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा एमआयएम ची मागणी
बी डी उबाळे
औसा: दि.२६ "ॲाल इंडिया मजलिस ए-इत्तेहादुल मुस्लिमीन " (एमआयएम) प्रमुख तथा हैदराबादचे खासदार असदोद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काही समाज कंटक हल्लेखोरांनी मंगळवारी रात्री उशिरा निवासस्थानावर हल्ला चढविला. यात घराची तोडफोड करून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता या प्रकरणी दि. 22 सप्टेंबर बुधवार रोजी औसा पोलिस निरीक्षकांना निवेदन पत्र देण्यात आले व दि. 23 सप्टेंबर गुरुवार रोजी एमआयएम तालुका व शहरच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले आहे. याविषयी माहिती की, खा. असदोद्दीन ओवैसी यांचे नवी दिल्लीतील " 24 अशोक रोड येथे घर असून तेथे काही समाज कंटक हल्लेखोरांनी निदर्शने केली त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच समाज कंटक हल्लेखोरांनी घरावर हल्ला करत घराची तोडफोड करून नामफलक, कंदील आणि खिडक्या, दरवाज्यांचे नुकसान करत खिडक्या व तावदानांचे काचा फोडण्यात आल्या. हल्ला झाला तेव्हा खासदार असदोद्दीन ओवैसी घरात नव्हते, व घराचा सुरक्षा रक्षक हा जीवघेणा हल्ला करतील म्हणून पळून गेला. अतिशय हायप्रोफाईल भागात असलेल्या ओवैसींच्या निवासस्थानातील घरावर हल्ला झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून समाज कंटक हल्लेखोरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत गेल्या पाच वेळा हल्ला खासदार असदोद्दीन ओवैसी वर करण्यात आला आहे. भाजपच्या राजवटीत देशात सध्या कट्टरतावादाचे स्तोम माजले आहे. यामुळे खासदार ओवैसींच्या घरावरील हल्ल्यास सर्वस्वी केंद्रातील भाजपचे सरकार जबाबदार असून त्या हल्लेखोरांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी औसा पोलिस निरीक्षकांना ॲड. रफिक शेख, ॲड. गफरुल्ला हाश्मी, एमआयएमचे तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्या वतीने करण्यात आले तसेच औसा एमआयएम तालुका व शहर च्या वतीने तहसीलदार औसा मार्फत निवेदन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंदना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर तालुका व शहराचे कार्यकर्ते ॲड गफरुल्ला हाश्मी, ॲड. रफिक शेख, तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, सय्यद कलिम, शेख इरशाद, अजहर कुरेशी, अफसर शेख, रफिक बागवान, शेख अलीम, शेख मुशीर, शेख अल्ताफ, शेख बाबर, सय्यद जमीर, शेख वली, शेख अलीम, शेख नाजम, इरफान सय्यद, रफत बागवान, आसिफ बागवान, महेबूब खान, माजीद पटवेकर यांच्या सह्या आहेत.

0 Comments