तीन ऑक्टोबर रोजी केंद्र सरकार विरोधात सोयाबीन सत्याग्रह आंदोलन- अभय साळुंके
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय साळुंके यांनी पत्रकार परिषद काँग्रेस कार्यालय जिजाऊ चौक,निलंगा येथे संपन्न झाली. यावेळी सोयाबीनचे कमी झालेले भावासंदर्भात केंद्र सरकार च्या विरोधात दि. 3 ऑक्टोबर रोजी शेतात व गावात काळे झेंडे लाऊन शेतकरी विरोधी मोदी सरकार चा निषेध करण्यासाठी सोयाबीन सत्याग्रह आंदोलन करणार असल्याचे सांगितले. यावेळी निलंगा तालुका काँग्रेस चे अध्यक्ष विजयकुमार पाटील, सुधाकर पाटील, ॲड. नारायण सोमवंशी, अजित निंबाळकर, गिरीष पात्रे, माधवराव पाटील, शकील पटेल, , तुराब बागवान, सोमनाथ कदम आदीची उपस्थिती होती.

0 Comments