Latest News

6/recent/ticker-posts

शिवसेनेच्या शहर संघटक पदी अॅड़ मजहर शेख यांची निवड

शिवसेनेच्या शहर संघटक पदी अॅड़ मजहर शेख यांची निवड



बी जी शेख

औसा: दि २६ - रोजी औसा येथें जिल्हा अध्यक्ष  शिवाजी राव  माने साहेब यांच्या अध्यक्षते खाली बैठक  संपन्न झाली या बैठकित औसा शहर पदअधिकारयांची नियुक्ति करण्यात आली,बैठकीला युवा सेना जिल्हा प्रमुख  अॅड़ राहुल मातोलकर ,शहर प्रमुख  सुरेश दादा भूरे, जयश्रीताई उटगे, बंडू कोद्रे, संजय उजळंबे, नाना माने युवा सेना प्रमुख   गणेश गायकवाड़  इत्यादी शिवसैनिक यांच्या उपस्थितित शहर संघटक म्हणून अॅड़ मजहर शेख याची निवड करण्यात आली तसेच उपशहर प्रमुख म्हणून गोविंद खंडागले बालाजी माने, गणेश कलसे, सचिन पवार, याची निवड करण्यात आली व पुढ़ील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा प्रमुख यांच्या आदेशानुसार शिवसेना स्वताच्या बळावर पालिकेच्या निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले. अॅड़ मजहर शेख यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



Post a Comment

0 Comments