Latest News

6/recent/ticker-posts

माता-पित्यांचा शोध घेत फिरणाऱ्या कन्येची वृद्धाश्रमात आश्रयास आलेल्या माता-पित्यांची भेट

माता-पित्यांचा शोध घेत फिरणाऱ्या कन्येची वृद्धाश्रमात आश्रयास आलेल्या माता-पित्यांची भेट




मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) घरातून बेपत्ता झालेल्या आई-वडिलांचा तपास करत पुणे येथील एका कन्येने कासार शिरशी येथील वृद्धाश्रम गाठले, व वृद्धाश्रमात आश्रयास आलेल्या आपल्या आईवडिलांची गळाभेट करत खऱ्या अर्थाने या वृद्धाश्रमात जागतिक कन्या दिन साजरा केला. यामुळे बराच वेळ वृद्धाश्रमातील वातावरण भावनाविवश झाले होते. घरातील नेहमीच्या किरकोळ कारणाने कंटाळून, तुरोरी तालुका उमरगा येथील शिवाजी देवराव पाटील वय 85 वर्ष व सौ दैवता पाटील यांनी कासार सिरशी येथील आधार वृद्धाश्रमात आधार घेतला आहे. दरम्यानच्या काळात यांची प्रकृती अस्वस्थतेच्या कारणाने यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यांची कोणीही चौकशी न केल्याने यांची माहिती संस्थेचे अध्यक्ष सौ मनीषा होळकुंदे यांनी पोलिस ठाण्याला दिली होती, पण सध्या यांची तब्येत चांगली असून या कन्येने आई वडीलास कडकडून मिठी मारत या आश्रमातील वृद्धांच्या सेवेबाबत समाधान व्यक्त केले. या भावना विवश प्रसंगाने आश्रमातील वृद्धांचे हृदय हेलावले तर आज या वृद्धाश्रमाने खऱ्या अर्थाने जागतिक कन्या दिन साजरा केला असल्याचे वृद्धाआश्रमाचे अध्यक्ष मनिषा होळकुंदे यांनी सांगितले.




Post a Comment

0 Comments