Latest News

6/recent/ticker-posts

सोमवारी औसा तालुका,शहर कॉग्रेस कमिटी व तालुका युवक कॉग्रेस कडून भारत बंद,औसा बंदचे आवाहन

सोमवारी औसा तालुका,शहर कॉग्रेस कमिटी व तालुका युवक कॉग्रेस कडून भारत बंद,औसा बंदचे आवाहन


बी डी उबाळे

औसा: महाराष्ट्र काँग्रेस कमीटीच्या सुचनेनुसार तथा प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख व युवानेते.श्रीशैल उटगे यांच्या मार्गदर्शनानुसार सोमवार, दि.27 सप्टेंबर 2021 रोजी केंद्र सरकारच्या जनता विरोधी निर्णयाच्या तसेच शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात विरोध दर्शवण्यासाठी भारत बंद च्या आवाहन नुसार औसा बंद मध्ये औसा तालुका व शहर  काँग्रेस कमिटी व औसा तालुका युवक काँग्रेस कमिटी सक्रिय सहभाग घेणार आहे व त्यासाठी आपण सोमवार,दि.27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता ,किल्ला मैदान औसा येथे जमणार आहोत. तरी आपण सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक,लातूर जिल्हा व शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्याक सेल,ओ.बी.सी. सेल, NSUI,सोशल मिडिया,इंटक,विलासराव देशमुख युवा मंच आदी सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीशैल उटगे, दत्तोपंत सुर्यवंशी,शकील शेख, हणंमत राच्चटे,हमिद सय्यद, राजेंद्र बनसोडे, गणेश कसबे,भागवत माळी, हाजी शेख,नियामत लोहारे, यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments