औसा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न अनेक तडजोडी,प्रकरणे निकाली
बी डी उबाळे
औसा: औसा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रम संपन्न शनिवार दि.२५ सप्टेंबर २०२१ रोजी तालुका विधी सेवा प्राधिकरण व वकील मंडळ औसा यांच्या संयुक्त विद्यमाने मा.जिल्हा न्यायाधीश लातूर यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते, या लोकन्यायालयाचे उद्घाटन औसा न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा.प्राची आर कुलकर्णी यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.या लोकन्यायालयात दिवाणी १५१ प्रकरणं,फौजदारी ३ ,वादपुरव औसा, किल्लारी, उजनी या भारतीय स्टेट बँकेच्या २३ प्रकरणात तडजोड होऊन ६लाख ,५०हजार रुपये कर्ज वसुली झाली.दुरसंचार विभागाचे ०७ प्रकरणात तडजोड केली त्यामध्ये १२हजार ७६४ रुपये बील वसुली झाली. पहील्यांदाच औसा पंचायत समीतीचे वतीने गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये सहभाग नोंदवला व केंद्र व राज्य शासनाच्या वतीने घरकुल योजनेच्या लाभासाठी निधी घेऊन बांधकाम सुरू करण्यास टाळाटाळ करणाऱ्या लाभार्थींना नोटीस बजावली व पंधरा दिवसांत घरकुल बांधकाम सुरू करण्याचे हमीपत्र लिहून घेतले. या लोकन्यायालयात औसा वकील मंडळाचे वतीने अध्यक्ष ॲड श्रीधर जाधव यांनी जास्तीत जास्त प्रकरण तडजोडी साठी ठेवण्यासाठी विशेष परीश्रम घेतले. त्यामुळे केवळ एकच पॅनल असताना सुद्धा प्यानल प्रमुख तथा दिवाणी न्यायाधीश माननीय प्राची कुलकर्णी मॅडम यांनी आतापर्यंतच्या झालेल्या लोकन्यायालयात सर्वात जास्त प्रकरण निकाली काढण्याचा विकृम नोंदवला आहे.त्यांना या कामी न्यायालयीन सर्व कर्मचारी वर्ग, प्यानल विधिज्ञ ॲड बोरफळे, ॲड म्हेत्रे, वकील मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी ,विविध ब्यांक व्यवस्थापक, उपस्थित सर्व पक्षकार या सर्वांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळे हे लोक न्यायालय अंत्यंत शांततेत यशस्वीपणे पार पडले आहे.

0 Comments