निटूर येथे गणेश उत्सवा संदर्भात शांतता समितीची बैठक संपन्न
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) कोरोनाच्या पार्श्वभिमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत या वर्षीचा गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करून प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन पोलीस निरीक्षक ए डी सुडके यांनी निलंगा तालुक्यातील निटुर येथील पोलिस चौकीमध्ये गुरुवारी गणेश उत्सवा संदर्भात शांतता समितीच्या बैठकीत केले. शिरूर आनंतपाळ पोलीस स्टेशन अंतर्गत निटूर(मोड) चौकी येथे शांतता बैठक आयोजित करण्यात आली होते. या बैठकीस निटूर बीट अंमलदार सत्यवान कांबळे, पो.काॅ.हरिदास कांबळवाड, पो.काॅ. शिवानंद गीरबोने हे उपस्थित होते. राजकुमार सोनी, शिवराज सोमवंशी, सिध्देश्वर सोमवंशी, लतीफ चाऊस, माधव कांबळे, प्रताप सुडे, निटूरसह संबंधीतील गावातील सरपंच,पोलीस पाटील यांच्या सह गावातील मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुडके म्हणाले की, कोरोना महामारी अध्यपही संपली नाही. यंदाच्या गणेश उत्सवासाठी शासनाने काही निर्बंध घातले आहेत. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर्षीचा गणेश उत्सव शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. त्याच बरोबर गणेश उत्सव दरम्यान गर्दी होईल असे असे कुठलेही कार्यक्रम करता येणार नाहीत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर व तसेच सामाजिक उपक्रम साजरे करून गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन ए डी सुडके यांनी केले.

0 Comments