रमेशभाऊ मित्र मंडळाच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा निटूर येथे सन्मान
निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) तालुक्यातील निटुर येथे रमेशभाऊ लांबोटे मित्र मंडळाच्या वतीने येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल मध्ये रमेश लांबोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पत्रकार, पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिरूर आनंतपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए डी सुडके, पोलीस चौकीचे बीट अंमलदार सत्यवान कांबळे, संजय गांधी निराधार योजनेचे निलंगा तालुका सदस्य सुरेंद्र धुमाळ, भारतीय जनता पार्टीचे नेते तथा निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, निटुर पंचायत समितीचे सदस्य कालिदास पाटील, संभाजी ब्रिगेड चे निलंगा तालुका अध्यक्ष प्रमोद कदम, गणराज्य संघाचे लातूर जिल्हा अध्यक्ष रामलिंग पडसाळगे, औराद कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ सदस्य गंगाधर चव्हाण, बौद्ध महासभेचे निलंगा तालुका अध्यक्ष रोहित बनसोडे, Adv. तिरुपती शिंदे, ज्येष्ठ पत्रकार मोहन शिरसागर, राजाभाऊ सोनी, परमेश्वर शिंदे, मिलिंद कांबळे, रविकिरण सूर्यवंशी, संपादक के वाय पटवेकर, संपादक असलम झारेकर, जावेद मुजावर, रमेश शिंदे, माधव शिंदे, राम साळुंके, नामदेव तेलंगे, मल्लिकार्जुन कोले, एस आर काळे, संगमेश्वर करंजे, सह प्रभाकर लांबोटे, पंकज भालके, मल्लिनाथ बुरकुले, भरत चव्हाण, राम भोयबर, सह रमेशभाऊ लांबोटे मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments