ॲड. तिरूपती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व कोरोना योद्ध्यांचा सन्मान
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्ट निलंगा च्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष तथा निलंगा वकील मंडळाचे माजी अध्यक्ष ॲड. तिरूपती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सर्वरोग निदान, रक्तदान शिबीर व कोरोना योध्दे यांचा सत्कार सोहळा निलंगा तालुक्यातील अंबुलगा मेन येथे निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव यांच्या उपस्थित उत्साहात संपन्न झाला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक प्रणिता गायकवाड, निलंगा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, निलंगा तालुका संगायो समिती चे सदस्य सुरेंद्र धुमाळ, निलंगा पंचायत समिती चे माजी सभापती अजितराव माने, डॉ. लालासाहेब देशमुख, वकील मंडळाचे अध्यक्ष ओम माने, पंचायत समिती सदस्य महेश देशमुख, रमेश जाधव, रमेश लांबोटे, मराठी अस्मितेचा इशारा वृत्तपत्राचे संपादक के.वाय.पटवेकर, लोकमत चे निलंगा तालुका प्रतिनिधी गोविंद इंगळे, जावेद मुजावर, असलम झारेकर, रमेश लांबोटे, एकमतचे निलंगा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण पाटील, पुण्य नगरी चे निलंगा तालुका प्रतिनिधी परमेश्वर शिंदे, पत्रकार राजकुमार सोनी, रमेश शिंदे, माधव शिंदे, नामदेव तेलंगे, राम साळुंके, एस आर काळे आदी तालुक्यातील पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. यावेळी कोरोना काळामध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे तथा आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी व समाजसेवकांचा त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना कोरोना योद्धा म्हणून मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.




0 Comments