Latest News

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अमरदिप बोरे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अमरदिप बोरे 


देवणी:(प्रतिनिधी विक्रम गायकवाड) खा.शरद पवार यांचा विचार देवणी तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणारे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत धडपड करणारे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्टीचे सच्चे कार्यकर्ते म्हणुन अमरदिप बोरे यांची सर्वत्र ओळख आहे.यांच्या कार्याची दखल घेऊन आमदार बाबासाहेब पाटील यांनी अमरदिप बोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यकरणीत एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली.याबाबद्दल अमरदिप बोरे याच सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments