Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा येथे राज्यस्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

निलंगा येथे राज्यस्तरीय योगासन निवड चाचणी स्पर्धा उत्साहात



रमेश लांबोटे

लातूर: योगा फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र योगा असोसिएशन संलग्नित असलेली अधिकृत संघटना रुरल अँन्ड अर्बन योगा असोसिएशन, लातूर च्या वतीने सन २०२१ लातूर जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा व राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन आज दिनांक २० सप्टेंबर २०२१ सोमवार रोजी दुपारी १२:०० "मातोश्री" सभागृह, महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा जि. लातूर येथे covid-19 च्या नियमाचे पालन करत उत्साहात संपन्न झाले. या योगासन स्पर्धेमध्ये जिल्हा भरातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. सदर असोसिएशनचे सचिव मुजीबमिया सय्यद यांनी खेळाडूंना योगासन स्पर्धेचे नियम व नियमावली बाबत मार्गदर्शन केले. या स्पर्धा वेगवेगळ्या वयोगटानुसार घेण्यात आली अनुक्रमाने प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या खेळाडूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेकरता करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.संजीवनी सबनीस(राज्यस्तरीय पंच) या होत्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार मल्लिकार्जुन कोल्ले, शिवाजी महाविद्यालय उदगीरचे क्रीडा प्रमुख निहाल खान, विधीज्ञ मंडळ निलंगाचे माजी अध्यक्ष Adv. तिरुपती शिंदे, पत्रकार रमेश लांबोटे, पत्रकार नामदेव तेलंगे हे होते. सौ. सबनीस व अमरदीप पाटील यांनी पंच म्हणून आपली भूमिका पार पाडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत सोनवणे यांनी केले तर आभार अमरदीप पाटील( राज्यस्तरीय पंच) यांनी मानले सदर असोसिएशनच्या अध्यक्षाने राज्यस्तरीय निवड चाचणीला पात्र ठरलेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वीसाठी अर्चना राठोड, यशोदा पाटील, अल्फिया बेग, वसुंधरा अपसिंगेकर, कोमल कटके आदींनी परिश्रम घेतले.




Post a Comment

0 Comments