केळगाव येथे वीज पडून शेतकऱ्याचा बैल दगावला
केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) तालुक्यातील केळगाव येथे सोमवार (दि २०). रोजी सायंकाळी 7:00 वाजता विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात येथील शेतकरी माधव बालाजी सुतळे हे शेतातून घराकडे जात असताना गावालगतच्या झाडाखाली थांबलेल्या बैलावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. बैलाची किंमत जवळपास ६० हजार असुन शेतकऱ्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने गावात हळहळ होत आहे. या घटनेबाबत तलाठ्यांना माहिती देण्यात आली असून तात्काळ पंचनामा करून मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

0 Comments