Latest News

6/recent/ticker-posts

माझं लातूर, साई फाऊंडेशन आणि आम्ही चाकूरकर यांच्याकडून पूरग्रस्त वाहन चालक आणि प्रवाशांना खिचडी,केळी आणि पिण्याच्या पाण्याची सोय

माझं लातूर, साई फाऊंडेशन आणि आम्ही चाकूरकर यांच्याकडून पूरग्रस्त वाहन चालक आणि प्रवाशांना खिचडी,केळी आणि पिण्याच्या पाण्याची सोय 



के वाय पटवेकर

लातूर: मांजरा नदीवरील लातूर-नांदेड रस्त्यावर भातखेडा पुलावर पाणी आल्‍यामुळे मंगळवारी (ता.२८) रात्री पासून अडकलेेेेल्‍या प्रवाशी व वाहनचालकांना जेवणाची पंचायत झाली होती त्यामुळे माझं लातूर परिवार, साई फाऊंडेशन आणि आम्ही चाकूरकरच्या वतीने बुधवारी (ता.२९) खिचडी, केळी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. लातूरकरांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या माझं लातूर परिवाराने आपल्या सामाजिक कार्याचा पायंडा कायम ठेवत आज पुन्हा एकदा आपली सामाजिक जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. कोरोना काळातील मदत केंद्र, निवारा केंद्र, रक्तदान शिबीर, सांगली-रत्नागिरी पूरग्रस्तांना मदत, नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून सातत्याने लातूरच्या सामाजिक चळवळीला गतिमान  करून सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचे कार्य माझं लातूर परिवाराने केले आहे. माझं लातूर परिवाराच्या डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात माझं लातूरचे प्रमुख शिलेदार सतिष तांदळे, अभय मिरजकर, काशिनाथअप्पा बळवंते, तम्मा पावले, प्रा.डॉ. सितम सोनवणे, संजय स्वामी, विनोद कांबळे, राहुल मातोळकर, ऍड प्रदीप मोरे, दिपरत्न निलंगेकर, प्रमोद गुडे, साई फाऊंडेशनचे अनिरुद्ध पाटील, दत्ता करंडे, आकाश कुलकर्णी, समीर पठाण, अमोल मुंढे, राम कारलेवाड, रामेश्वर पाटील यांनी तर आम्ही चाकूरकरचे संगमेश्वर जनगावे, विनोद निला, सदाशिव मोरे पाटील, वर्धमान कांबळे, हाकानी शेख यांच्यासह भातांगळीतील शुभम पडिले, नागनाथ वादकारले यांच्यासह युवकांनी सहकार्य केले. प्रशासनाच्या वतीने बुधवारी दुपारी प्रायोगिक तत्वावर पुलावरून वाहतूक सुरु करण्यात आली आहे.




Post a Comment

0 Comments