प्रा.डॉ.शैलजा परमेश्वर हासबे (दामरे) यांना स्वा.रा.ती.म. विद्यापीठ. नांदेडच्या वतीने इतिहास विषयांत विद्यावाचस्पती(PHD)पदवी प्रदान
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) येथील दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.शैलजा शंकरप्पा दामरे-हासबे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या वतीने नुकतीच इतिहास विषयांत विद्यावाचस्पती (पीएच.डी) प्रदान करण्यात आली. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड परिक्षेत्रातील मध्ययुगीन मठ: एक चिकित्सक अभ्यास या विषयावर विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता त्यांच्या शोधप्रबंधास विद्यापीठाने पीएच.डी पदवी साठी मान्यता दिली .त्यांच्या या संशोधन कार्यास मार्गदर्शक म्हणून डॉ.शिवराज बोकडे, पिपल्स महाविद्यालय,नांदेड यांचे मार्गदर्शन लाभले.

0 Comments