Latest News

6/recent/ticker-posts

पिण्यायोग्य पाणी येत नसल्याच्या तक्रारी नंतर भादा पंचायतीला आली जाग जागो-जागी बसवले नवीन वाॅल

पिण्यायोग्य पाणी येत नसल्याच्या तक्रारी नंतर भादा पंचायतीला आली जाग-जागो जागी बसवले नवीन वाॅल


शेख बी जी

औसा: दि.२९ - औसा तालुक्यातील भादा येथे पिण्यायोग्य पाणी येत नसल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते फारुख पठाण यांनी ग्रामपंचायतीला लेखी अर्ज दिला व पिण्यायोग्य पाणी देण्याची विनंती केली. मागील अनेक दिवसापासून गढूळ पाणी येत असल्याने याबाबत कोणीही तक्रार करायला धजत नव्हता. मात्र वेळोवेळी आजारी पडत असलेल्या येथील सामाजिक कार्यकर्ते फारुख पठाण यांनी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यासाठी लेखी अर्ज दिला. त्यानंतर येथील ग्रामपंचायतीने ज्या ठिकाणाहून हे पाणी नळाला येत आहे याचा शोध घेऊन जागोजागी पाण्याचे नवीन वाॅल टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. यापूर्वीही डासांचे प्रमाण वाढल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढले होते. याबाबतही अशाच पद्धतीचा अर्ज ग्रामपंचायतीला दिला गेला होता. त्यानंतर सर्वत्र फवारणी करण्यात आली होती. याबाबत येथील ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्याने सांगितले होते की "पावसाळ्यात अशाच प्रकारचे पाणी येते ते पिण्यायोग्य नाही" प्रत्येक वेळेला अर्ज दिल्याशिवाय येथील प्रशासन  हलत नाही असे निदर्शनास येते. तुमच्या अर्ज दिल्यामुळे आम्हाला पिण्यायोग्य पाणी येईल अशा शब्दात सामाजिक कार्यकर्ते फारुख पठाण यांचे धन्यवाद व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

0 Comments