Latest News

6/recent/ticker-posts

डॉ.सचिन सगर यांची शिवसेना मदत कक्षाच्या मराठवाडा समनवयक डॉक्टर सेल पदी निवड

डॉ.सचिन सगर यांची शिवसेना मदत कक्षाच्या मराठवाडा समनवयक डॉक्टर सेल पदी निवड


द्रोणाचार्य कोळी/ प्रतिनिधी

मदनसुरी: मंगळवार दि.28 सप्टेंबर रोजी निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील रहिवासी असलेले डॉक्टर सचिन हणमंतराव सगर यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या मराठवाडा समनवयक डॉक्टर सेल या पदासाठी सहा महिण्यासाठीच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे. शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात (10%+10%) राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्यागरीब रुग्णांना पूर्णतःमोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जनारोग्ययोजने अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयात गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर राहण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.त्याच्या या निवडीबद्दल कोकळगाव परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.

Post a Comment

0 Comments