Latest News

6/recent/ticker-posts

तेरणा नदीचा परिसर पाण्याने झाकला,सोयाबीनच्या शेंगानी चिखलाचा तळ गाठला,अन बळीराजाचा घास कोरडाच राहिला

तेरणा नदीचा परिसर पाण्याने झाकला,सोयाबीनच्या शेंगानी चिखलाचा तळ गाठला,अन बळीराजाचा घास कोरडाच राहिला

   


  

प्रतिनिधी,/द्रोणाचार्य कोळी

मदनसुरी: मागील दोन दिवसापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे तेरणा नदी काठच्या परिसरात नदी, नाले, ओढे महापुरामुळे जलमय झाले असून, कोकळगाव, मदनसुरी, लिंबाळा आदी गावच्या तेरणा नदीवरील बरेजेस ओव्हर फ्लो वाहत आहेत. यामुळे जवळपास तीस ते चाळीस गावच्या वाहतुकीचा संपर्कच बंद झालेला आहे. मागील काही महिन्यात सोयाबीनचे पिके बहरू लागली होती, हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर नैराश्याची छाया दाटली असून, आता जगावे कसे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. नदी हत्तरगा, कोकळगाव, मुदगड एकोजी, सांगवी, जेवरी, कामलेवाडी, मदनसुरी, यलमवाडी, लिंबाळा, आदी गावच्या शेतकऱ्यांनी बी बियाणे, खत, औषध फवारणी, अशा विविध खर्चाचा बाजार करून सोयाबीन पिकांना सजवले होते, पण तेरणा तीरी आलेल्या महापुरामुळे हजारो हेकटरवरअसलेल्या  सोयाबीनच्या शेगांनी चिखलाचा तळ गाठल्याने  तेरणेचा राजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. स्थानिक लोक प्रतिनिधी, खासदार, आमदार , प्रशासकीय अधिकारी यांनी तेरणा काठी जलाशयांनी निर्माण झालेल्या परिस्थितिची दखल घ्यावी व शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी तेरणा काठच्या परिसरातील बळीराजाद्वारे करण्यात येते आहे.

Post a Comment

0 Comments