पिक विमा कंपनीने ऑफलाइन अर्जाची मुदत वाढववी- प्रा.आण्णासाहेब मिरगाळे
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) केंद्र सरकारने लागू केलेली प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा ऑफलाईन अर्ज पिक विमा कंपनीने एका दिवसात शेतकऱ्यांनी भरून पाठवावा असा आदेश दिला. लातूर जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी आहेत. तसेच निलंगा तालुक्यामध्ये जवळपास सव्वातीन लाख शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांचे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. विमा कंपनीने एका दिवसात तीन लाख शेतकऱ्यांना विमा ऑफलाईन अर्ज भरा असा आदेश काढला. पण सर्व शेतकरयाना एका दिवसात ऑफलाईन अर्ज जमा करणे शक्य नाही. यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश रेशमे यांच्या सूचनेनुसार युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी कृषी कार्यालयामध्ये पीक विमा प्रतिनिधी यांना याबद्दल जाब विचारला व धारेवर धरले. जिल्हा पिक विमा प्रतिनिधी भोसले यांना फोनवरून मुदत वाढवण्यासाठी मागणी केली. शेतकऱ्यांना दोन दिवसात ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी वेळ द्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना व युवासेनेच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रशांत वाजरवाडे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख बालाजी माने, गणेश लादे, सोपान लोहारे, नागनाथ बाबळसुरे, प्रसाद मठपती इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments