अचवला येथे शेताच्या बांधावर ई-पीक नोंदनीचे प्रशिक्षण
देवणी:{ प्रतिनिधी/विक्रम गायकवाड } आज दिनांक १६ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मध्ये समाविष्ट ग्रामपंचायत अचवला येथे तालुक्याचे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी ई-पीक पाहणी करण्या करता मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सातबारा ऑनलाईन करण्यासाठी महसूल विभागाला अंदाजे तब्बल १६ वर्षे लागली, पण आता पिक पेरा भरण्याची जबाबदारी स्वतः वैयक्तिक शेतकऱ्यांनाच दिल्यामुळे अतिशय जलद गतीने हे कार्य होत आहे असे यावेळी सरांनी सांगितले. लवकरात लवकर गावातील १००% इ-पीक पाहाणी भरून घेण्याचे सांगितले व यासंदर्भात नकारात्मक विचारसरणी ठेऊ नये असा संदेश या वेळी दिला. यावेळी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनी सुद्धा कोवीड नियमावलीचे पालन करीत मास्क लावून उपस्थित होते. कार्यक्रमास तहसीलदार श्री सुरेश घोळवे, तलाठी कुकर, ग्रामसेवक नागलगावे, उपसरपंच नामदेवराव कारभारी, सदस्य विष्णु बन, गावातील शेतकरी, युवक व VSTF देवणी तालुका समन्वयक सागर तापडिया आदी उपस्थित होते.


0 Comments