Latest News

6/recent/ticker-posts

भादा पोलिसांचे धाडसत्र सुरुच,वडजी येथे जुगार खेळणाऱ्यास अटक

भादा पोलिसांचे धाडसत्र सुरुच,वडजी येथे जुगार खेळणाऱ्यास अटक


शेख बी जी 

औसा: दि.१६ तालुक्यातील भादा पोलीस ठाण्यात अवैध धंद्याचे प्रमाण वाढले होते.त्यामुळे काही दिवसापूर्वी महिलांनी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता .यावर आता भादा पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून काल रात्री भादा ते वडजी जाणाऱ्या रोडलगत वडजी शिवारात बालाजी दगडू मुळे यांच्या शेतात पत्त्याचा जुगार शौकीनांची महफिल सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी यशस्वी रित्या धाड टाकली. यात शेतमालक बालाजी दगडू मुळे हे ही पत्ते खेळताना आढळून आल्याने त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून यात एकूण दहा आरोपीना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून  4 लाख 38 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी भादा पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास नवले पीएसआय शिंदे यांनी धाड यशस्वी केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे जुगार ,मटका, दारू विकणार्‍यांची धाबे दणाणले आहे.

Post a Comment

0 Comments