युवा सेनेचा दणका कामाला तात्काळ सुरुवात
निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) निलंगा तालुक्यातील मौजे ननंद येथील मागील अनेक दिवसापासून नालेसफाई व कीटकनाशकाची फवारणी झाली नव्हती गटविकास अधिकारी यांना निवेदन दिल्या बरोबर आज ग्रामपंचायत कार्यालय जागे झाले व तात्काळ नालेसफाई व कीडनाशक फवारणी कामाला सुरुवात केली. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा आण्णसाहेब मिरगाळे, यांच्या पाठिंब्यामुळे व जनार्धन होगडे,उद्धव जाधव,राम लादे, विलास माळी, व्यंकट पाटील, हाशीम पटेल, रामेश्वर मिरगाळे, महेश स्वामी, नितिन मिरगाळे, सतिश लादे, या सर्व शिवसैनिकांच्या पाठपुराव्याला यश मिळाले.

0 Comments