Latest News

6/recent/ticker-posts

गणेश उत्सव साद्या पद्धतीने साजरा करा; नळेगाव येथे शांतता बैठकित पोलीस प्रशासनाचे आवाहन

गणेश उत्सव साद्या पद्धतीने साजरा करा; नळेगाव येथे शांतता बैठकित पोलीस प्रशासनाचे आवाहन


नळेगाव
:( प्रतिनिधी बाळासाहेब बरचे ) कोरोनाच्या पार्श्वभिमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत या वर्षीचा गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करून प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन चाकूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी गावडे यांनी केले. चाकूर पोलीस स्टेशन अंतर्गत नळेगाव चौकी येथे आज शांतता बैठक आयोजित करण्यात आली होते. या बैठकीस चाकूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी गावडे,पोलीस जमादार दामोदर शिरसाठ, पोलीस अंमलदार अंबादास पाटील, शैलेश सुडे, पोलीस नाईक मामडगे, दगडू सावळकर, कैलास चव्हाण, अभिजित मुंजाने,गोविंदराज सावंत,सागर भांडवले, रामेश्वर विभूते, सुनील माचवे, सुरज पांचाळ यांच्या सह गावातील मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावडे म्हणाल्या कि कोरोना महामारी अध्यपही संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट वाढत असली तरी याहीवेळी यंदाच्या गणेश उत्सवासाठी शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर्षीचा गणेश उत्सव शासनाने घालून दिलेल्या  सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव  साध्या पद्धतीने साजरा करावा असे शासनाने घातलेल्या निर्बंधामध्ये नमूद केले असून सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे असे गावडे म्हणाल्या.गणेश स्थापना व गणेश मिरवणूक काढता येणार नाही.सार्वजनिक ठिकाणी गणेश स्थापना करता येणार नाही व तसेच गणेश मूर्तीची उंची हि  चार फूट तर घरगुती गणेश मूर्तीची उंची दोन फूट असलेल्या गणेश मूर्तींना शासनाणे परवानगी दिली आहे. त्याच बरोबर गणेश उत्सव दरम्यान गर्दी होईल असे असे कुठलेही कार्यक्रम करता येणार नाहीत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर व तसेच सामाजिक उपक्रम साजरे करून गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन नलिनी गावडे यांनी केले. ज्या ठिकाणी स्थापना केली आहे त्या ठिकाणी मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर चा वापर करावा व लहान मुलांना सॅनिटायझर पासून दूर राहण्यास सांगितले.या सर्व नियमांचे पालन करीत गणेश भक्तांनी गणेश उत्सव साजरा करावा असे यावेळी सांगितले. यावर्षीचा गणेश उत्सव सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत पोलीस बंदोबस्तात साजरा करणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments