धानोरा ग्रामपंचायतीचे मूलभूत विकास कामाकडे होत आहे दुर्लक्ष;ग्रामस्थांच्या वाढल्या अडचणी
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील मौजे धानोरा ग्रामपंचायतचे गावातील मूलभूत विकास कामाकडे दुलक्ष पहावयास मिळत आहे. गावातील मागासवर्गीय वस्ती व राठी गल्ली येते काही दिवसांपासून विद्युत पुरवठा बंद आहे वारंवार सांगून सुद्धा विद्युत पुरवठा सुरळीत करत नाहीत. इशारा प्रतिनिधीशी बोलताना गावातील सुनील काळे म्हणाले मागील 2 महिन्यापासून विद्युत पुरवठा बंद आहे तसेच गावात मागील 10 दिवसापासून नळाला पाणी येत नाही. उपसरपंच यांना पाण्याबद्दल प्रश्न विचारला असता उडवा उडवीची उत्तरे देत आहेत अशी माहिती सूर्यकांत सुर्यवंशी यांनी इशारा प्रतिनिधीशी बोलताना दिली तसेच गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे दारूमुळे काही जणांचे संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. दारू गावात मिळत असल्याने मद्यपीची संख्या वाढून विनाकारण गावात वाद विवाद होत आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावातील सुजान नागरिकांडून संताप व्यक्त होत आहे.

0 Comments