Latest News

6/recent/ticker-posts

नळेगाव परिसरात विविध आजाराने ग्रामस्थ त्रस्त

नळेगाव परिसरात विविध आजाराने ग्रामस्थ त्रस्त


नळेगाव:( प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे ) चाकूर तालुक्यातील नळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे विविध आजाराने डोके वर काढले आहे. यामध्ये सर्दी,ताप, खोकला,हातपाय दुखणे या सारख्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सरकारी तसेच खाजगी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.अगोदरच कोरोना या महामारीने नागरिक काळजीत आहेत.त्यामध्ये भर म्हणून नळेगावकर डेंग्यूसारख्या आजाराने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. कोरोना व डेंगू या आजारांमध्ये काही प्रमाणात साम्य असल्यामुळे नागरिक द्विधा मनस्थितीत आहेत.दवाखान्यात गेलो तर आपल्याला कोणता आजार आहे हे कळण्याच्या अगोदरच कोरोनाची चाचणी करून घेण्याची भीती काहींना वाटत आहे.त्यामुळे दवाखान्यात जाण्याचे काहीजण टाळत असल्याने आजार वाढण्याची शक्यता आहे. सर्व सामान्य जनतेच्या हाताला काम नाही त्यामध्येच असे आजार डोके वर काढत असल्यामुळे आर्थिक झळ सोसावी लागत आहे.नळेगाव हे 20 ते 25 हजार लोकसंख्या असलेले गाव असून गावात रुग्ण संख्या वाढत असताना देखील प्रशासन काहीही उपाय योजना करत नसल्याने रुग्ण संख्या वाढत आहे.आरोग्य विभाग नळेगाव यांनी गावातील सर्व प्रकारच्या पाण्याचे नमुने प्रयोग शाळेत पाठवून ग्रामपंचायत कार्यालय नळेगाव यांना पत्र पाठवून नळेगाव हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून येथे पूर्ण गावभर फवारणी करावी असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.तरी ग्रामपंचायतीने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments