भेटा येथे पुरक पोषण आहार,बेटी बचाओ, बेटी पढाओ नाटिका व वाढदिवस साजरे
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भेटा येथे महाराष्ट्र व केंद्र शासन पुरस्कत एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प भेटा येथे दि.२२ सप्टेंबर रोजी पोषण आहार अभियान कार्यक्रम साजरी करण्यात आला. सप्टेंबर महिना पुरक पोषण महाअभियान म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अभियाना दरम्यान प्रामुख्याने पोषण आहार व
त्याचे महत्त्व, स्तनपान, वैयक्तिक स्वच्छता, शिक्षण, आरोग्य या विषयांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. पोषण आहार, चांगल्या आरोग्याच्या सवयींचे महत्त्व पटवून देण्यात आले. पोषण आहार अभियान अंतर्गत पंजीकरण अर्धवार्षिक वाढदिवस, बेटी बचाओ बेटी पढाओ छोटीसी नाटिका हे उपक्रम घेण्यात आला. प्रामुख्याने ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांच्या पोषण व आरोग्य विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे. योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे सामान्य आरोग्य व पोषण, पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण, संदर्भ सेवा अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण आरोग्य व पोषण शिक्षण इत्यादी सेवा उपलब्ध आहेत. विविध वर्ष गटातील वयोगटातील बालके, गर्भवती व स्तनदा माता किशोरवयीन मुली या योजना अंतर्गत लाभ मिळत असतो. बालकांच्या योग्य शारीरीक, मानसिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे. अर्भक मृत्यू , बालमत्यू, कुपोषण व शाळा गळतीच्या प्रमाणात घट करणे. बाल विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरण निश्चिती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेसाठी प्रभावी समन्वय कायम ठेवणे. योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण इत्यादी याविषयी बोलताना बालविकास प्रकल्प अधिकारी किशोर गोरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला भेटा येथील ग्रामसेविका कट्टीमनी मॅडम, सरपंच शाम शेळके, दत्ता भोसले, सोमनाथ माने, सुधीर वाघमारे,महेश जेटनवरे एकात्मिक बाल विकास प्रकल्प पर्यवेक्षका कटके मॅडम, आशा कार्यकर्ती, विद्यार्थी, महिला उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भेटा येथील अंगणवाडी सेविका पुष्पा जेटनवरे, आशा बचाटे, रूक्मिण हजारे, सविता सोनवणे, तसेच मदतनीस मध्ये शामल ढोले, निर्मला वाघमारे, भागीरथी कोल्हापूरे, मंगल ढोले या सर्वांनी कार्यक्रमास मदत नियोजन केले.


0 Comments